उद्धव ठाकरे व‌ देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड गुफ्तगू.... चर्चेला उधाण

 

उद्धव ठाकरे व‌ देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड गुफ्तगू.... चर्चेला उधाणमुंबई: एकीकडे रत्नागिरीत केंद्रीय मंत्री नारायण राणे शिवसेनेवर  हल्लाबोल करत असताना दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याचं समजतंय. ओबीसी आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्र्यांसोबत सर्वपक्षीय बैठक आज सह्याद्री अतिथिगृहात पार पडली. या बैठकीनंतर या दोन्ही नेत्यांमध्ये ही वेगळी भेटी झाली आहे. या वेगळ्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, आधी फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांमध्येच चर्चा झाली. सेना भाजपा वाद सुरू असतानाच दोन मोठ्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्यानं तर्कवितर्कांना एकच उधाण आलं आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post