शिवसेनेशी युती असताना आमचा श्वास कोंडत होता, देवेंद्र फडणवीस यांचा सेनेला बोचरा टोला

 

शिवसेनेशी युती असताना आमचा श्वास कोंडत होता, देवेंद्र फडणवीस यांचा सेनेला बोचरा टोलामुंबई:  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांनी वक्तव्य केलं होतं की, युतीत आमची 25 वर्षे सडली. त्यानंतर आता भाजप नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. युतीत श्वास कोंडत असल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

पुणे जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करताना शिवसेनेवर निशाणा साधला आहे. राज्यात युती असताना अनेक ठिकाणी पक्ष विस्तार करताना काही अडचणी येत होत्या, श्वास कोंडत होता अशी कडवट टीका भाजपाचे नेते आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्यातील पक्षाचे सरकार असल्याने भाजपला आता मोठी संधी आहे जशा आशा बुचके तुमचा श्वास कोंडत होता तसा आमचाही काही ठिकाणी श्वास कोंडत होता असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आता तीन पक्ष एकत्र आले आहेत, पूर्वी युतीमुळे पक्ष वाढवण्यासाठी काही मर्यादा होत्या पण आता आम्ही मोकळा श्वास घेत आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुका भाजपा स्वबळावर निवडणूक लढवेल आणि सत्तेत येईल असे वक्तव्य फडणीस यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post