अफगाणिस्तान ताब्यात घेतात तालीबानचा भारताला मोठा झटका...

 

अफगाणिस्तान ताब्यात घेतात तालीबानचा भारताला मोठा झटका... नवी दिल्ली: तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर आता त्यांच्याबरोबर शेजारी किंवा इतर देशांसोबतचे संबंध देखील बदलू लागले आहेत. भारत आणि अफगाणिस्तान हे जवळचे मित्र आहेत, पण तालिबान सत्तेवर येताच त्यांनी भारतासोबतचे आयात आणि निर्यात दोन्ही बंद केले आहेत. तालिबाननं भारतासोबतची सर्व प्रकारची आयात आणि निर्यात रोखली आहे. फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायजेशनचे महासंचालक डॉक्टर अजय सहाई यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे.


तालिबानने पाकिस्तानच्या हवाई मार्गाने होणारी कार्गो वाहतूक थांबवली आहे. देशातून होणारी आयातही रोखण्यात आली आहे. अफगाणिस्तानातील अस्थिरतेमुळे पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची दाट शक्यता असल्याने भारतात सुकामेवा महागण्याचे संकेत आहेत. सुकामेव्याच्या मिठायांच्या किंमतीही वाढणार असल्याचं चित्र आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post