आ.निलेश लंके यांची संवेदनशीलता...दिव्यांग विद्यार्थ्याला दिलं मोठं गिफ्ट

आ.निलेश लंके यांची संवेदनशीलता...दिव्यांग विद्यार्थ्याला दिलं मोठं गिफ्टनगर : आमदार निलेश लंके यांना आमदार म्हणून जे मानधन मिळते त्यातून एक सामाजिक बांधिलकी म्हणून अपंगा साठी प्रत्येक महिन्याला एक तीन चाकी इलेक्ट्रिक बाईक देण्याचे त्यांनी ठरवले होते.त्यानुसार काळकुप येथील अतुल अशोक कदम या दिव्यांग बांधवाला त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तीन चाकी इलेक्ट्रिक मोटर बाईक भेट दिली.

         अतुल अशोक कदम हा  काळकुप येथील रहिवाशी असून तो अहमदनगर येथे  ITI चे शिक्षण घेत आहे. अतुल कदम हा पाया मध्ये अपंग असल्याने कॉलेज ला ये जा करण्यासाठी त्याला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असे. काही दिवसापूर्वी त्याची अडचण घेऊन तो पारनेर येथील जनसंपर्क कार्यालयात तो मला भेटला. त्याची व्यथा ऐकून त्याची मदत करण्याचे ठरवले. त्यानुसार त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्याला तिने चाकी इलेक्ट्रिक बाईक भेट दिली. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान वाटले, असे आ.लंके यांनी म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post