तहसीलदार देवरे ऑडिओ क्लिप...उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

 वरिष्ठ महिला सचिवांमार्फत चौकशी व्हावी, उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदनपुणे : पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांच्या व्हायरल ऑडिओ क्लीपची दखल घेत विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोर्‍हे यांनी त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर देवरे यांच्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन दिले आहे. दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशीअंती वस्तूस्थिती समोर येईल. महसूल प्रशासनातील अधिकार्‍यांशीही चर्चा केल्याचे त्यांनी सांगीतले.


पारनेर येथील तहसीलदार ज्योती देवरे यांची आत्महत्येच्या विचाराबाबत क्लीप व्हायरल झाल्यानंतर ना.डॉ. गोर्‍हे यांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. त्यानंतर शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. वरिष्ठ महिला सचिवांतर्फे या घटनेची चौकशी व्हावी, असे त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.


देवरे यांच्यासंदर्भात विभागीय आयुक्तस्तरावर लक्ष घालण्यात आलेले आहे, मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सांगीतले. तर महिला अधिकार्‍यांमार्फत चौकशी सुरू असल्याची माहिती नगर जिल्हाधिकार्‍यांनी दिली. या विषयांमध्ये मार्ग काढण्यासाठी ना.डॉ.गोर्‍हे प्रयत्न करणार आहेत. चौकशीत तपशिलाची अपेक्षा असेल असे डॉ.गोर्‍हे यांनी म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post