मुलाला गळफास देऊन महिलेचीही आत्महत्या‌...


मुलाला गळफास देऊन महिलेचीही आत्महत्या‌...नाशिक:  दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी  शिवारात एका 25 वर्षीय विवाहित महिलेने एका इसमाच्या जाचाला कंटाळून आपल्या सात वर्षीय मुलास गळफास देत स्वतः गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबतचे वृत्त असे की वनारवाडी गावात संगीता प्रकाश पवार( वय25) रा मंगरुळ ता चांदवड ही आपला मुलगा कार्तिक प्रकाश पवार( वय -7वर्ष ) याच्यासोबत भाड्याच्या खोलीत राहत होती तिच्यासोबत पोपट संपत पवार (वय 30 )रा मंगरूळ ता चांदवड हा इसम राहत होता.

यातील संशयित आरोपी पोपट संपत पवार हा नेहमी दारू पिऊन मारहाण व शिवीगाळ करीत होता त्याच्या नेहमीच्या जाचाला कंटाळून मयत संगीता पवार हिने गुरुवारी 4 ऑगस्ट रोजी आपला मुलगा कार्तिक याला गळफास देत त्याचा खून करीत स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली.

ही घटना उघडकीस आल्यानंतर दिंडोरी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मयत संगीता पवार यांच्याविरुद्ध मुलगा कार्तिक पवार यास गळफास दिल्याबद्दल खुनाचा गुन्हा दाखल केला तर सोबत राहणारा इसम पोपट संपत पवार याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा बद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे

घटनेचा तपास दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंत तारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक सचिन नवले करीत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post