शुभमंगल 'सावधान'.... लग्नाच्या दुसर्याच दिवशी नवरी पसार... नवरदेवाने गाठलं पोलिस स्टेशन

 

शुभमंगल 'सावधान'.... लग्नाच्या दुसर्याच दिवशी नवरी पसार... नवरदेवाने गाठलं पोलिस स्टेशनधुळे : थाटामाटात लग्न झाल्यानंतर  दुसर्‍याच दिवशी नववधु रफुचक्कर  झाली असून फसवणूक  केल्याप्रकरणी चौघांवर तालुका पोलिसात  गुन्हा दाखल झाला आहे.


याबाबत रविंद्र पांडुरंग पाटील (वय 34 वडगाव ता. धुळे) या सेंट्रींग कामगाराने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्याला लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याचा चौघांनी गैरफायदा घेतला. जंग्गु शंकर पगारे, सुनिल शंकर कोळी (रा. जुने धुळे) व एक भारती नामक महिला यांनी फिर्यादीचे ज्योती राजेंद्र शिंदे (रा. मालेगाव) हिच्याशी लग्न लावून देण्याचा विश्वास संपादन केला.


लग्न लावून देवून त्यासाठी फिर्यादीकडून 1 लाख 10 हजार रूपये घेतले. मात्र लग्न झाल्यानंतर एका दिवसातच मुलगी घरातून निघुन गेली. त्यावरून वरील चौघांवर फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे. तपास उपनिरीक्षक विजय चौरे करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post