१२०० कोटी रुपये कुठे गेले? गुंडगिरी करणारे पोसू नका, ॲड.प्रताप ढाकणे यांचा आ.राजळेंवर निशाणा

१२०० कोटी रुपये कुठे गेले? गुंडगिरी करणारे पोसू नका, ॲड.प्रताप ढाकणे यांचा आ.राजळेंवर निशाणा नगर: पाथर्डीच्या राजकारणात ढाकणे विरूद्ध राजळे संघर्षाचा नवा अध्याय सुरू झाला असून विकासकामांच्या दाव्यावरून राष्ट्रवादीचे नेते ॲड. प्रताप ढाकणे यांनी भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना प्रश्न विचारले आहेत.     

तुमच्या ताब्यात असणारी पंचायत समिती, नगरपालिका, खरेदी-विक्री संघ व वृद्धेश्वर साखर कारखाना या संस्था नेमके कोण चालवते? तालुक्यासाठी आणलेले बाराशे कोटी रुपये नेमके कुठे गेले, असे प्रश्‍न उपस्थित करून, तुमचे सल्लागार बदला, असा सल्ला  ॲड. प्रताप ढाकणे  यांनी आमदार मोनिका राजळे  यांना त्यांचे नाव न घेता दिला. त्याचा हिशेब जनतेला मिळालाच पाहिजेयेथील एम. एम. निऱ्हाळी विद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ॲड. ढाकणे बोलत होते. नगरसेवक बंडू बोरुडे, योगेश रासने, वैभव दहिफळे उपस्थित होते. ढाकणे म्हणाले, ‘‘तालुक्याच्या जडणघडणीत माधवराव निऱ्हाळी, बाबूजी आव्हाड, रावसाहेब म्हस्के यांच्यासह माजी मंत्री बबनराव ढाकणे व आप्पासाहेब राजळे यांचे योगदान मोठेच आहे. आज जे चाललेय ते बरे नाही. तालुक्यासाठी आलेले बाराशे कोटी खर्च केले असते, तर तालुक्याचे नंदनवन झाले असते. कोविडसाठी एक कोटी रुपयांचा निधी आमदारांना मिळाला. तो नेमके कुठे खर्च झाला? हे जनतेचे पैसे आहेत. त्याचा हिशेब जनतेला मिळाला पाहिजे.’’ पालिकेचा शहरस्वच्छतेचा ठेका मागील वर्षी ९६ लाखांना गेला. या वर्षी एक कोटी ८० लाखांना कसा दिला, मधले पैसे नेमके कोणाला मिळाले? बाजार समितीत एवढा गोंधळ केला, की मला ती ताब्यात घेऊन पश्चात्ताप वाटला. पंचायत समितीत चुकीच्या बिलाला नाही म्हणणाऱ्यांना तुम्ही कशी शिक्षा देताय? तुमचे सल्लागार बदला. गुंडगिरी करणारे पोसू नका. अशी टीका करीत ढाकणेंनी आगामी काळात अधिक तीव्रतेने विरोध करू, असे सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post