महिला तहसीलदार आत्महत्येच्या विचारात, व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे खळबळ, राष्ट्रवादीच्या आमदारावर

 

लोकप्रतिनिधी व वरिष्ठांच्या जाचामुळे महिला तहसीलदार आत्महत्येच्या विचारात, व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे खळबळ, राष्ट्रवादीच्या आमदारावर अंगुलीनिर्देशनगर : नगर जिल्ह्यातील पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिप तयार करून आत्महत्येचा इशारा दिला आहे. या क्लिपमुळे पारनेरसह जिल्ह्यात खळबळ उडाली. यापूर्वी वनाधिकारी दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येचा संदर्भ देत देवरे यांनी ऑडिओ क्लिप जारी केलीय. या क्लिपमध्ये महिला अधिकारी म्हणून काम करताना नोकरीत होणारा त्रास आणि वरिष्ठांचे दुर्लक्ष याबाबत सविस्तर कथन केलंय. देवरे यांचा अंगुलीनिर्देश थेट राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या कडे असल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.विशेष म्हणजे या महिला तहसिलदारांनी लोकप्रतिनिधींकडून होणाऱ्या त्रासाविषयी देखील या ऑडिओ क्लिपमध्ये माहिती दिलीय. या महिला तहसिलदारांची ऑडिओ सध्या चांगलीच व्हायरल झाल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात चर्चांना उधाण आले आहे. या क्लिपमध्ये महिला अधिकारी म्हणून होणारा त्रास, वरिष्ठांकडून केले जाणारे दुर्लक्ष, नोकरीत येताना केलेला निर्धार आणि प्रत्यक्षात झालेली निराशा अशा अनेक गोष्टींवर सविस्तर कथन केलंय.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post