विधानसभेचा नूतन अध्यक्ष भाजपचा असेल, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा

विधानसभेचा नूतन अध्यक्ष भाजपचा असेल, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा पुणे: महाराष्ट्रात काल झालेल्या परिस्थितीवर भाजपच्या विविध नेत्यांनी आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. परंतू काल झालेल्या परिस्थितीवर भाजपचा काय मुड आहे, याबाबत भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत  पाटील   यांनी आज साम टिव्हीला सविस्तर मुलाखत दिली आहे. मुलाखतीत त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. अनेक मोठी विधीनं देखील केली आहेत.


12 आमदारांच्या निलंबणाबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले आमदार निलंबीत करण्याची उद्धव ठाकरेंची  इच्छा नव्हती. विधानसभा अध्यक्षांच्या निवडणूकीसाठी 12 आमदार निलंबीत केले असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. नियम तोडून अध्यक्ष पदाची निवडणूक घेऊ नका रितसर निवडणूक झाली तर अध्यक्ष भाजपचा असेल असेही ते म्हणाले. ''माझी अशी माहिती आहे 12 आमदारांच्या निलंबनासाठी राष्ट्रवादी आग्रही होती'' असे पाटील म्हणाले आहेत.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post