मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'मास्क' काढला.... म्हणाले....

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'मास्क' काढला.... म्हणाले....नाशिक: नाशिक दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी आज महाराष्ट्र पोलीस अकादमीतील विविध विकासकामांचं उद्घाटन केलं. त्यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचं भाषणही झालं. भाषणाच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी चेहऱ्यावरचा मास्क काढला. जाहीर कार्यक्रमात विनामास्क ते प्रथमच दिसले. यापूर्वी कधीच ते असे दिसले नव्हते. त्यामुळं उपस्थितांमध्ये कुजबुज सुरू झाली. हे लक्षात येताच मुख्यमंत्री म्हणाले, 'आज पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात मास्क काढलाय. बऱ्याच दिवसांनंतर मास्क काढून मोकळ्या वातावरणात बोलतोय.'

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post