कहाणी में ट्विस्ट....आ. निलेश लंके यांनी मारहाण केली नाही, 'त्या' लिपिकिचा दावा

 आमदार निलेश लंके यांनी मारहाण केली नाही, 'त्या' लिपिकाचा दावानगर: आमदार निलेश लंके यांनी पारनेर ग्रामीण रूग्णालयातील कनिष्ठ लिपिकास लसीकरणावरून मारहाण केल्याची तक्रार वैद्यकीय अधिकारी यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कडे केली होती. या वृत्तामुळे मोठी खळबळ उडाली असताना संबंधित लिपिकाने अशी कोणतीही मारहाण झाली नाही असा दावा करीत खुलासा केला आहे.  राहुल दिलीप पाटील यांनी म्हटले आहे की,0

राहुल दिलीप पाटील, कनिष्ठ लिपीक ग्रामिण रुग्णालय पारनेर असे सूचीत करीतो की काल बुधवार दिनांक

04/08/2021 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास रुग्णालय अधिक्षक डॉ.सौ. उंद्रे मॅडम यांनी फोन करून मला

रूग्णालयात बोलावले होते. त्यावेळी तेथे कोवीड लसीकरण टोकन वाटपावरून गोंधळ सुरू

होता. सदर

गोंधळाबाबत कोणत्यातरी तक्रारीवरून शहनिशा करण्यासाठी आमदार निलेश लंके साहेब तेथे आले होते. त्यांनी रुग्णालय अधिक्षक सौ. डॉ. उंदे यांना गोंधळाबाबत जाब विचारला त्यानंतर झाल्या प्रकाराबाबत आमदार साहेब गटविकास अधिकारी व पोलीस निरीक्षक यांच्या समक्ष पंचनामा केला. झालेल्या प्रकाराबाबत डॉ. उंद्रे यांनी माफी मागितली त्यानंतर आमदार साहेब तेथून निघून गेले.

दिनांक 05/08/2021 च्या सुमारास तालुक्यातील काही राजकीय मंडळी ग्रामिण रुग्णालय येथे आले होते. त्यांनी काही राजकिय मंडळी ग्रामिण रूग्णालय येथे आले होते. त्यांनी काही पत्रकारांना माझा फोन नंबर देऊन आमदार लंके यांनी मारहान केल्याचे व शिविगाळ केल्याचे बोल असे मला सांगण्यात आले. दबावापोटी मी घाबरलो व त्यांनी सांगितले त्याप्रमाणे स्टेटमेंट दिले होते. प्रत्यक्षात तसे काहीही घडलेले नाही.

आमदार साहेब यांनी मला शिविगाळ केलेली नाही किंवा कुठलीही मारहाण केलेली नाही. सोशल मिडियावर प्रसारित होणाऱ्या पोस्ट चुकीच्या व माझ्या बदनामी करणाऱ्या आहेत. यासंबंधी चुकीची व खोटी पोस्ट करणाऱ्यांविरुद्ध मी रीतसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज केलेला आहे.
0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post