वाळु तस्करांची गुंडगिरी, तलाठी व कोतवालास शिवीगाळ करून हातपाय तोडण्याची धमकी

 वाळु तस्करांची गुंडगिरी, तलाठी व कोतवालास शिवीगाळ करून हातपाय तोडण्याची धमकीनगर: विनापरवाना वाळू वाहतूक करणारा टेम्पो पकडल्याच्या कारणावरुन तलाठ्यास शिवीगाळ,  हातपाय तोडण्याची धमकी  दिल्याची घटना नेवासा तालुक्यातील चिंचबन शिवारात घडली असून याबाबत फिर्यादीवरुन गुन्हा दाखल  करण्यात आला आहे.


याबाबत खुपटी येथील कामगार तलाठी गणेश आप्पासाहेब घुमरे (वय 32) यांनी फिर्याद दिली. १० ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास चिंचबन ते नेवासा रोडवर  असलेल्या गणेश शिंदे यांचे वस्तीजवळ दत्तात्रय आसाराम हिवरे रा. नेवासा खुर्द व त्याचे दोन अनोळखी साथीदार व टेम्पो चालक (नाव गाव माहित नाही) यांनी शासकीय कर्तव्य बजावत असताना त्यांचा वाळू वाहतूक करणारा टेम्पो का पकडला? या कारणावरुन मला व माझे सोबत असणारे कोतवाल बाळासाहेब सुखदेव चौधरी असे आम्हास शिवीगाळ करुन धक्काबुक्की करत तुमचे आम्ही आता हातपाय मोडून टाकू अशी धमकी  देवून पकडलेला बिगर नंबर आयशर टेम्पो यामध्ये दोन ब्रास वाळूसह चोरी  करुन घेवून पळून गेले.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post