चिक्की घोटाळा, पंकजा मुंडे व न्यायालयाची विचारणा... धनंजय मुंडे म्हणाले...

 चिक्की घोटाळा...माझी मागणी कोर्टाने लक्षात घेतली आहे : मंत्री धनंजय मुंडेबीड :  'माजी मंत्री  पंकजा मुंडे  यांच्या काळातील कथित चिक्की वाटप घोटाळ्या   प्रकरणात अजूनही खासगी पुरवठादारांवर एफआयआर दाखल का केला नाही? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारला आहे. त्यामुळे नव्याने चर्चा सुरू झाली आहे. आता राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी 'माझी मागणी कोर्टाने लक्षात घेतली आहे. आधीपासून मी सांगत होतो गुन्हा दाखल करा' अशी प्रतिक्रिया देत पंकजा मुंडेंवर निशाणा साधला आहे.

चिक्की घोटाळा निघाल्यापासून माझी सातत्याने मागणी आहे की, याची सखोल चौकशी झाली पाहिजे, गुन्हे दाखल केले पाहिजे आणि आज नाही 2 वर्षापूर्वी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एसीबीकडे अर्ज केला आहे. सगळा विषय कोर्टात आहे. त्यामुळे माननीय कोर्ट काय निर्णय घेईल ते पाहू' असं मतही धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलं.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post