नगर तालुक्यातील 'या' ग्रामपंचायतीचा ८० वा वर्धापन दिन साजरा, आजी माजी सरपंचांचा सत्कार

 चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीचा ८० वा वर्धापन दिन साजरा
नगर : चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीचा ८० वा वर्धापन दिन आजी माजी सरपंचाच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला .  कार्यक्रमाचे प्रारंभी दिवंगत कै. बाजीराव चंदनमल गांधी ,कै.  नारायण रामजी जगताप, कै. खंडेराव पर्वतराव ठोंबर, कै.  माणिकचंद गणेशमल कांकरिया ,कै.  रामकिसन गोविंद खडके,  कै.  यशवंत लिंबाजी पवार ,कै.  खंडू केरु खराडे ,कै. रघुनाथ पंढरीनाथ हजारे, कै.  आबासाहेब नानाभाऊ खडके नऊ सरपंचाचे स्मरण करून त्यांनी गावच्या विकासात दिलेल्या योगदाना बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली . 

             त्यानंतर आजी माजी सरपंच शंकर विठोबा पवार , पांडुरंग दत्तात्रय कोकाटे , बाजीराव भानुदास हजारे , राजाराम पंढरीनाथ हजारे , मच्छिंद्र कोंडीबा खडके , दिपक गिरधरीलाल चौधरी , अमोल धोंडीबा कोकाटे , सौ. अर्चना दिपक चौधरी ,  सौ. अंजनाबाई दिलीप पवार  यांचा सत्कार करण्यात आला . विद्यमान सरपंच मनोज राधाकिसन कोकाटे यांचा ही सन्मान करण्यात आला .

             चिचोंडी पाटील ग्राम पंचायतीची स्थापना 13 ऑगस्ट 1941 रोजी झाली त्याला आज ऐंशी वर्ष पूर्ण झाले . त्यानिमित्त गावच्या विकासात योगदान देणारे गावचे प्रथमनागरिक तथा सरपंच यांचा सन्मान  ग्रामपंचायत कार्यालया समोर  करण्यात आले .

             यावेळी जेष्ठ नागरीक श्रीरंग कोकाटे, कामधेनु पतसंस्थेचे चेअरमन डॉ ययाती फिसके , माध्यमिक शिक्षक सोसायटीचे माजी संचालक कल्याण ठोंबरे, जेष्ठ शिक्षक नेते आबासाहेब कोकाटे,  संस्थेचे राजेंद कोकाटे ,माजी सरंपच शंकरराव  पवार व आमोल कोकाटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

            यावेळी ग्रामपंचायतीच्या उप सरपंच कल्पना ठोंबरे, ग्रामपंचायत सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अशोक कोकाटे, माजी उपसरपंच शरद पवार , महेश जगताप, पांडुरंग ससे, ग्रा पं सदस्य दिपक हजारे , संदीप काळे , यशोदा कोकाटे , सविता खराडे, जयश्री कोकाटे आदि सह सर्व संस्थाचे आजी माजी  पदाधिकारी , संचालक व  ग्रामस्थ उपस्थित होते.

            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक प्रकाश ठोंबरे यांनी केले तर  सरपंच मनोज कोकाटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post