एकनाथ शिंदे यांच्यासह सेनेचे अन्य मंत्रीही नाराज आहेत : चंद्रकांत पाटील

 एकनाथ शिंदे यांच्यासह सेनेचे अन्य मंत्रीही नाराज आहेत : चंद्रकांत पाटीलमुंबई,  : केंद्रीय मंत्री नारायण राणे  यांनी छाती ठोक सांगतात म्हणजे त्यात नक्कीच तथ्य असेल. एकनाथ शिंदेच नाही तर अनेक मंत्री नाराज आहेत. मंत्री झाले लाल दिवा, कॅबिन, स्टाफ मिळतो पण या मंत्रिमंडळात रिमोट कंट्रोल अन्य ठिकाणी आहे' अशी टीका भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली आहे.


मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.


'नारायण राणे हे नव्याने भाजपमध्ये आले असले तरीही त्यांचा अनुभव दांडगा आहे. ज्या शिवसेनेबाबत ते बोलतात त्या सेनेत नारायण राणे सुद्धा होते. त्यामुळे त्यांनी जर छातीठोकपणे दावा केला असेल तर त्यात नक्की तथ्य असेल. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदेच नाही तर अनेक मंत्री नाराज आहेत' असा दावाही पाटील यांनी केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post