सिद्धांत छाजेड यांची हाफ आयर्नमन ट्रायथ्लॉन पूर्ण करण्याची कामगिरी

 सिद्धांत छाजेड यांची हाफ आयर्नमन ट्रायथ्लॉन पूर्ण करण्याची कामगिरी


जिद्द व आत्मविश्वासाच्या जोरावर गाठले यशोशिखरनगर : मनात जिद्द आणि ध्येयाप्रती निष्ठा असेल तर अशक्यप्राय गोष्टही सहजशक्य होते. स्काय ब्रिजचे मनोज व मुकेश छाजेड यांच्या परिवारातील युवा सिद्धंात छाजेड यांनी अशीच एक कठिण गोष्ट कठोर परिश्रमाने साध्य केली आहे. जगभरातील फिटनेसप्रेमींसाठी आव्हानात्मक अशी ट्रायथ्लॉन हाफ आयर्नमन पूर्ण करण्याची कामगिरी त्यांनी केली आहे. 1.9 कि.मी.जलतरण, 90 कि.मी.सायकलिंग आणि 21 कि.मी.धावणे या गोष्टी 7 तासांत पूर्ण करीत त्यांनी हाफ आयर्नमनचा किताब मिळवला आहे. कझाकिस्तानमध्ये होणारी ही स्पर्धा यंदा करोनामुळे पुण्यातच झाली व त्यात छाजेड यांनी बाजी मारली. संजीव शहा यांच्याकडून मिळालेली प्रेरणा व विजय गायकवाड यांचे मार्गदर्शन यामुळे ही कामगिरी शक्य झाल्याच छाजेड यांनी सांगितले.
वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही ही उक्ती लक्षात घेवून सिद्धांत यांनी ट्रायल्थॉन पूर्ण करण्याचा विडा उचलला. परंतु, वजन खूपच जास्त असल्याने 25 मीटर जलतरण करतानाही त्यांची दमछाक व्हायची. स्वप्न पूर्ण करायचे तर फिटनेस वाढवावा लागेल, कठोर मेहनत करावी लागेल हे त्यांना जाणवलं. त्यांनी दृढनिश्चय करून मार्च 2020 मध्ये प्रशिक्षणाला सुरुवात केली. फिटनेस फर्स्टचे विजय गायकवाड यांनीही त्यांना आत्मविश्वास दिला. यातून अतिशय अशक्यप्राय वाटणारी गोष्ट साध्य करीत सिध्दांत यांनी स्वत:मध्ये आमूलाग्र बदल केला. स्थूलता पूर्णपणे नाहीशी करून फिट ऍण्ड फाईन बनविले. याकाळात त्यांनी स्वत:ला प्रेरित केले. आई शर्मिला छाजेड व कुटुंबानेही त्यांना पाठबळ व प्रोत्साहन दिले. सर्व सज्जता झाल्यावर त्यांनी ट्रायल्थॉनमध्ये सहभाग घेतला व अवघड अशी कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली. फिटनेस व आरोग्यसंपदा हीच आजच्या काळाची गरज आहे. तुम्ही आज काय आहात याचा विचार करण्याऐवजी उद्या काय करायचे याचा विचार केला पाहिजे, असा सकारात्मक संदेश छाजेड यांनी दिला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post