भयानक...समृद्धी महामार्गावर भीषण अपघात..१३ जणांचा मृत्यू

 समृद्धी महामार्गावर भीषण अपघात..१३ जणांचा मृत्यू
बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील   तढेगावाजवळ समृद्धी महामार्गाच्या कामावरील डंपरचा भीषण अपघात झाला. या अपघातात 13 मजूरांचा जागीच मृत्यू झाला असून 5 मजूरांची प्रकृती अतिशय गंभीर आहे, तर 7 मजूर जखमी आहेत.  लोखंडी राॅडने भरलेल्या डंपरमधून 16 मजूर प्रवास करत होते.


सिंदखेडराजा तालुक्यातील तढेगाव जवळ एका परिवहन मंडळाच्या बसला साईड देताना समृद्धी महामार्गाच्या कामावरील डंपर रस्त्याच्याकडेला पलटी होऊन झालेल्या अपघातात 13 मजूरांचा मृत्यू झाला तर 12 मजूर जखमी झाले आहेत. जखमींपैकी 5 मजुरांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. जखमी मजुरांवर किणगाव राजा, सिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून काही गंभीर जखमींना जालना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. समृद्धी महामार्गाच्या कामावरील हे डंपर लोखंडी रॉड घेऊन समृध्दी महामार्गाच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की डंपर पलटी झाल्यावर लोखंडी रॉड खाली 16 मजूर दबले गेले आहेत. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post