शिवसेनेला जोर का झटका... 'या' महिला नेत्याचा भाजप प्रवेश

शिवसेनेला जोर का झटका... आशाताई बुचके यांचा भाजप प्रवेश पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या आशाताई बुचके भाजपात प्रवेश करणार आहेत. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत आशा बुचकेंचा पक्षप्रवेश होणार आहे. 

आशाताई बुचके शक्तीप्रदर्शन करत पुण्याहून मुंबईला रवाना झाल्या. मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्या भाजपप्रवेश करणार आहेत. जवळपास 15 वर्ष त्यांनी शिवसेनेचं काम केलं होतं, मात्र 2019 मधील लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर जुन्नर तालुक्यात मोठा राजकीय बदल शिवसेनेने केला होता. महिलांचे मोठं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्या आशा बुचके यांची शिवसेनेकडून हकालपट्टी करण्यात आली होती. आता त्या भाजपचा झेंडा हाती धरणार आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post