राज्यात राजकारण तापणार... भाजपच्या ४ केंद्रीय मंत्र्यांची स्वतंत्र 'जन आशिर्वाद' यात्रा

 

राज्यात राजकारण तापणार... भाजपच्या ४ केंद्रीय मंत्र्यांची स्वतंत्र 'जन आशिर्वाद' यात्रामुंबई:  भाजपने  राज्यात मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. नवीन केंद्रीय मंत्री झालेले चार नेत्यांना घेऊन भाजप जन आशीर्वाद यात्रा सुरू करणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून भाजप संपूर्ण राज्य पिंजून काढणार आहे.  

केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड आणि कपिल पाटील हे चार नवनियुक्त मंत्री जनआशीर्वाद यात्रेद्वारे जनतेशी संवाद साधणार आहेत. येत्या 16 ऑगस्टपासून राज्याच्या वेगवेगळया भागात ही जन आशीर्वाद यात्रा काढण्यात, अशी माहिती भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या यात्रेचे प्रमुख आमदार संजय केळकर यावेळी उपस्थित होते.

दरम्यान केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या यात्रेची सुरुवात गोपिनाथ गडावरुन होणार असून स्वतः माजी मंत्री पंकजा मुंडे या यात्रेला हिरवा झेंडा दाखविणार आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post