पंचायत समिती आवारात मोदींच्या फोटोशी छेडछाड....भाजपने दिला तोडफोड आंदोलनाचा इशारा

 गुन्हा दाखल करा अन्यथा तोडफोड आंदोलन...!

-


नगर: नगर तालुका पंचायत समितीच्या आवारामध्ये कोरोना लसीकरणाच्या जनजागृती संदर्भात लावण्यात आलेल्या बॅनर वरील प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या फोटो सोबत छेडछाड करणाऱ्या समाजकंटकावर ताबडतोब गुन्हा दाखल करावा अन्यथा भाजपा नगर तालुक्याच्या वतीने पंचायत समिती कार्यालयात तोडफोड आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपा नगर तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे यांनी गटविकास अधिकारी श्री.घाडगे यांना निवेदनाद्वारे दिला.


यावेळी पंचायत समिती सदस्य रवींद्रजी कडूस, दिपकजी कार्ले, दरेवाडीचे सरपंच सुभाषजी बेरड, दशमी गव्हाचेसरपंच बाबासाहेब काळे, तालुका सरचिटणीस गणेश भालसिंग,  बाप्पूसाहेब बेरड, तालुका उपाध्यक्ष प्रशांत गहिले, राजेंद्र दारकुंडे, पोपट शेळके, सागर भोपे, बबन शिंदे, महेश लांडगे, गोवर्धन शेवाळे, विजय गाडे, भाऊसाहेब बेल्हेकर, संतोष कोकाटे, बाप्पूसाहेब कोकाटे यांच्यासह आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post