व्यंकटेश मल्टीस्टेटमध्ये 'बिजनेस बुक्‍स' लायब्ररीचे उद्‌घाटन

 


"बीज नेशन'मधून नवीन उद्योजक बनतील: सागर कायगावकर; 

व्यंकटेश मल्टीस्टेटमध्ये 'बिजनेस बुक्‍स' लायब्ररीचे उद्‌घाटनअहमदनगर : प्रत्येक माणसाला जशी पोटाची भूक असते तशीच बुद्धीचीही भूक असते. बीज नेशनच्या माध्यमातून ती भूक आता शमली जाणार आहे. आपली माणस कशातच कमी नाहीत पण, एकमेकांची पाय ओढण्यात त्यांना रस आहे, ही वृत्ती आता सोडून द्यावी लागेल. जेवढे तुम्हाला दुसऱ्याला देता येईल तेवढे द्या आणि पुस्तक वाचणाऱ्याकडून त्यांचा अभिप्राय घ्या. व्यंकटेश फाउंडेशनच्या "बीज नेशन'मधून नवीन उद्योजक बनतील, असा आशावाद एस. जी. कायगावकर ज्वेलर्सचे संचालक सागर कायगांवकर यांनी व्यक्त केला.


व्यंकटेश फाउंडेशन संचलित उद्योग क्रांती चळवळीच्या माध्यमातून बिजनेस बुक्‍स लायब्ररीचे सोमवारी एस. जी. कायगावकर ज्वेलर्सचे संचालक सागर कायगावकर यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गजराज उद्योग समूहाचे संस्थापक सुरेश चव्हाण, नागेबाबा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष कडूभाऊ काळे, व्यंकटेश ग्रुपचे  अध्यक्ष अभिनाथ शिंदे आदी उपस्थित होते.

कडूभाऊ काळे म्हणाले, की व्यंकटेश उद्योग समूहाने उद्योग क्रांतीच्या माध्यमातून बीज नेशन सारखा अनोखा उपक्रम सुरू केला. नक्कीच त्यातून उद्योजक उघडतील. बहुतेक वेळा आपण दुसऱ्यासाठी काही करण्याचा विचार करीत नाही. कारण आपली माणसे एकमेकांची पाय ओढण्यात तरबेज असतात. पण, अभिनाथ शिंदे यांनी वेगळी वाट निवडली आणि बीज नेशनच्या माध्यमातून बिजनेस लायब्ररी सुरू केली. जगात आतापर्यंत घडलेली सर्व विद्वान माणसं ही पुस्तकाने घडविली. प्रत्येक माणसाला उद्योजक, श्रीमंत होण्याची भूक पाहिजे. तरच माणस यशस्वी होऊ शकतो, असे सांगून पुस्तक वाचल्यानंतर प्रत्येकाला अभिप्राय विचारा अशी सूचना मांडून ते म्हणाले की कोणाला फुकट काही देऊ नका. माणसाला त्याची किंमत कळत नाही. आपण समाजाचे देणे लागतो या भूमिकेतून नक्कीच काम करा असेही ते म्हणाले.

सुरेश चव्हाण म्हणाले, की व्यंकटेश फाउंडेशनचा उद्योग क्रांती उपक्रम चांगला आहे. बीज नेशनच्या माध्यमातून तरुणांना यशस्वी उद्योजकांची चरित्र वाचण्यास मिळतील. प्रत्येकाने वाचनाबरोबर संगीताची आवड जोपासली पाहिजे.

प्रास्ताविक करताना व्यंकटेश ग्रुपचे अध्यक्ष अभिनाथ शिंदे म्हणाले, की बीज-नेशनच्या माध्यमातून आपण भविष्यात उद्योजक बनिवण्याचा आपला संकल्प आहे. पुस्तक वाचण्यातून माणूस समद्ध होतो. ज्ञान आणि अनुभवाने माणूस मोठा होत असतो. सर्वच लोक यशस्वी उद्योजकांची पुस्तके वाचतात आणि ती वाचली पाहिजेत. बिजनेसच्या अनुशंगाने तालुका आणि जिल्हा पातळीवर अत्यंत कमी पुस्तके उपलब्ध आहेत. उद्योजकाच्या जणघडणीत पुस्तकांचा मोठा वाटा असतो. त्यामुळे बीज नेशनच्या माध्यमातून तालुका पातळीवर पुस्तके उपलब्ध करण्याचा मानस आहे. कृषिप्रधान देश अशी ओळख असलेल्या आपल्या देशाची उद्योगप्रधान देश अशी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. ही चळवळ सर्व सामान्य माणसासाठी आहे. 186 वर्षांपूर्वी नगर शहरात वाचन संस्कृती रूजली आता ती संस्कृती बीज-नेशनच्या माध्यमातून देशभर पोचायची आहे. यावेळी संजय दळवी, सुरेश मैड, गणेश दळवी, शंतनू खानवीलकर, व्यंकट देशमुख, कृष्णा मसुरे, ज्ञानेश झांबरे, मंगेश देहडकर ,रवी राऊत ,किशोर खोले, प्रमोद गर्जे आदी उपस्थित होते.

सूत्रसंचालन ऑर्टिस्ट ज्ञानेश शिंदे यांनी केले. उद्योजक अनिल गुंजाळ यांनी आभार मानले.


लायब्ररीच्या सेवेसाठी 9804041111 या नंबरला संपर्क करावा.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post