मोठी बातमी....भुजबळांची १०० कोटींची मालमत्ता जप्त, किरीट सोमय्या यांचे ट्विट

 


मुंबई :  राष्ट्रवादीचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांची 100 कोटी रुपयांची संपत्ती आयकर विभागाने जप्त केली आहे, असा दावा भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. आज सकाळी 7 वाजता ट्विट करत त्यांनी आयकर विभागाकडून भुजबळांची 100 कोटी रुपयांची संपत्ती जप्त झाल्याचा दावा केा आहे.

मंगळवारी इन्कम टॅक्स विभागाने प्रेसनोट जारी केलीय. समीर भुजबळ, पंकज भुजबळ आणि छगन भुजबळ यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे, जी संपत्ती, बेनामी मालमत्ता त्यांनी त्यांनी कलकत्त्याच्या कंपनीद्वारे खरेदी केली होती, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

सेशन कोर्टमध्ये बेनामी ट्रान्झॅक्शनच्या अंतर्गत फौजदारी प्रक्रिया दावा दाखल करण्यात आला आहे. त्याची सुनावणी होणार आहे. छगन भुजबळांना 7 वर्षापर्यंतची सजा होऊ शकते, असा दावाही किरीट सोमय्या यांनी केला आहे.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post