नगर जिल्ह्यातील 'या' धरणाच्या जलाशयाचे ९ ऑगस्टला नामांतर


नगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाच्या जलाशयाचे ९ ऑगस्टला नामांतर अकोले: केंद्र सरकारने खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलले असताना नगर जिल्ह्यातही नामांतराचे‌ वारे  वाहू लागले आहे. आदिवासी विकास परिषद व अन्य आदिवासी संघटना जागतिक आदिवासी दिनाचे  औचित्य साधत 9 ऑगस्टला क्रांती दिनी भंडारदरा धरणाचे नामांतर  करणार असून या धरणाला आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे यांचे नाव देण्यात येणार आहे.


आदिवासी विकास परिषद व आदिवासी संघटना एकत्र आल्या असून भंडारदरा येथील विल्सन जलाशयाचे नाव बदलून  क्रांतिवीर राघोजी भांगरे हे नाव येत्या ९ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून देण्याचे ठरले असल्याची माहिती आदिवासी विकास परिषदेचे जिल्हा अध्यक्ष विजय भांगरे यांनी दिली आहे.


भाजपचे राष्ट्रीय मंत्री तथा आदिवासी विकास परिषदेचे राज्य अध्यक्ष माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली भंडारदरा जलाशयावर हजारो तरुण एकत्र येऊन भंडारदरा जलाशयवर जाऊन क्रांतिवीर राघोजी भांगरे हे नाव सकाळी दहा वाजता देण्यात येणार आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post