लांब फेकण्याचा अनुभव असलेला खेळाडू टोक्योला पाठवला नाही, सुवर्णपदक हुकलं

 

लांब फेकण्याचा अनुभव असलेला टोक्योला पाठवला नाही, सुवर्ण पदक हुकलं

भाई जगताप यांची उपरोधिक पोस्टमुंबई: काँग्रेस नेते  भाई जगताप यांनी नरेंद्र मोदी यांचा एक फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे.

 सध्या सगळीकडेच ऑलिम्पिकचं वारं वाहत आहे. याच ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा एक खेळाडू टोक्योला पाठवलाच गेला नाही. त्यामुळे आपण सुवर्णपदकाची संधी गमावली, अशी पोस्ट केली आहे. मात्र, हे करताना त्यांनी या पोस्टसोबत नरेंद्र मोदींचा फोटो शेअर केला आहे.


आपल्या फेसबुकमध्ये भाई जगताप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो शेअर केला आहे. यात ते म्हणतात, “लांब फेकण्याचा सर्वोत्तम अनुभव असलेला देशाचा खेळाडू टोक्योला पाठवला गेला नाही. भारताने सुवर्णपदकाची संधी गमावली”.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post