राज्य सरकारच्या वाट्याचा निधी नसल्यामुळे नगर-बीड- परळी रेल्वे मार्गाच्या कामावर विपरीत परिणाम, खा.प्रितम मुंडे यांनी घेतली रेल्वे मंत्र्यांची भेट

राज्य सरकारच्या वाट्याचा निधी नसल्यामुळे नगर-बीड- परळी रेल्वे मार्गाच्या कामावर विपरीत परिणाम, खा.प्रितम मुंडे यांनी घेतली रेल्वे मंत्र्यांची भेटनवी दिल्ली: खा.  डॉ.प्रितम मुंडे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची आज दिल्लीत भेट घेतली.

नगर-बीड-परळी रेल्वे मार्गातील समस्यांबाबत यावेळी त्यांना माहिती दिली.प्रकल्पासाठी आवश्यक राज्य सरकारच्या वाट्याचा निधी मिळत नसल्यामुळे रेल्वेमार्गाच्या कामावर होणाऱ्या विपरीत परिणामाची चर्चा देखील केली.

तसेच या प्रकल्पासंदर्भात रेल्वे विभागाची त्यांच्या स्तरावर बैठक घ्यावी व संबंधितांना सूचना करण्याची मागणी केली,यावेळी त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देताना नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी संबंधितांना सूचना देणार असल्याचे सांगितले.या भेटीमुळे निश्चितच आपल्या रेल्वेमार्गाला गती मिळेल।

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post