नगर बाजार समितीत मुगाला ७ हजारांहून अधिक भाव, शेतकऱ्यांना महत्वाचे आवाहन

 नगर बाजार समितीत मुगाला ७ हजारांहून अधिक भाव, शेतकऱ्यांना महत्वाचे आवाहननगर :- कृषि उत्पन्न बाजार समिती, मुख्य यार्डचे भुसार विभागामध्ये मुग या शेतमालाची आवक सुरु झाली असून आज सोमवार दिनांक 09/08/2021 रोजी 500 ते 600 डाग आवक आली आहे. त्यास जास्तीत-जास्त बाजारभाव प्रति क्विंट्ल रुपये- 7150/- इतका मिळाला आहे. मा.जिल्हाधिकारी साहेब, अहमदनगर यांचे आदेशानुसार दुपारी 4.00 वाजे पर्यंत भुसार बाजार चालु असल्याने लिलाव सकाळी 11.00 वाजेता सुरु होणार असून सर्व मुग उत्पादक शेतकरी बांधवानी आपला शेतमाल सकाळी 11.00 वाजेपर्यंत  विक्रीसाठी सुकवून व स्वच्छ करुन आणावा. असे आवाहन बाजार समितीचे सभापती श्री.अभिलाष रावसाहेब घिगे यांनी केले, लिलावा दरम्यान उपसभापती संतोष म्हस्के, सचिव अभय भिसे, सह सचिव सचिन सातपुते, विभागप्रमुख कराळे हे उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post