मंत्री सुनील केदार यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा, कॉंग्रेस नेत्याचीच मुख्यमंत्र्यांकडे मागणी

 मंत्री सुनील केदार यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा, कॉंग्रेस नेत्याचीच मुख्यमंत्र्यांकडे मागणीनागपूर :  काँग्रेस पक्षाचे विदर्भातील नेते, माजी आमदार आशीष देशमुख यांनी आपल्याच पक्षाच्या मंत्र्यावर कारवाई करा अशा आशयाचे एक पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. त्यांच्याच पक्षाचे मंत्री सुनील केदार  यांच्याविरोधात  कारवाई करण्याची मागणी देशमुख यांनी केली आहे.


2002 मध्ये मंत्री सुनील केदार नागपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना त्यांनी बँकेचे 150 कोटी रुपये खासगी दलालांमार्फत रोख्यांमध्ये गुंतवून बँकेचे दीडशे कोटी रुपयांचे नुकसान केल्याचे आरोप सुनील केदार यांच्यावर आहेत. या प्रकरणी केदार व इतर 10 आरोपींविरुद्ध महाराष्ट्र राज्याच्या सहकार खात्याने कोर्टात खटला दाखल केला आहे.

हा खटला गेली 19 वर्षे कोर्टात सुरु आहे. आता या प्रकरणी सरकारी वकील म्हणून असिफ कुरेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असिफ कुरेशी हे काँग्रेसच्या लीगल सेलचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे ते या खटल्यात योग्य बाजू मांडू शकत नसल्याचा आरोप करत अॅडव्होकेट असिफ कुरेशी यांची नेमणूक रद्द करावी अशी मागणी आशिष देशमुख यांनी केली आहे.


यासोबतच मंत्री सुनील केदार यांनाही मंत्रिमंडळातून बरखास्त करावे, अशी मागणी करणारे पत्र आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post