तहसीलदार देवरे प्रकरण... अण्णा हजारे म्हणतात असे भ्रष्ट अधिकारी तालुक्यात नको

तहसीलदार देवरे प्रकरण... अण्णा हजारे म्हणतात असे भ्रष्ट अधिकारी तालुक्यात नकोनगर : पारनेरच्या तहसिलदार ज्योती दवरे यांनी स्थानिक आमदार निलेश लंकेंसह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर छळाचा आरोप केला. यानंतर त्यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झालीय. आधी जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल देत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. आता आमदार निलेश लंके यांनी ज्येष्ठ समाजसेवर अण्णा हजारे यांची भेट घेतली. त्यानंतर अण्णा हजारे यांनीही असे भ्रष्ट अधिकारी तालुक्यात नको म्हणत वेळ पडल्यास थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार असल्याचं मत व्यक्त केलं. त्यामुळे एकूणच सुसाईड नोट म्हणून ऑडिओ क्लिप जारी करणाऱ्या पारनेरच्या तहसिलदारांवर कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता आहे.

आमदार निलेश लंके यांनी शनिवारी (21 ऑगस्ट) अण्णा हजारे यांची भेट घेऊन पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या ऑडिओ क्लिपच्या अनुषंगाने चर्चा केली. तसेच तहसीलदारांवरील आरोपांचीही माहिती देताना आपली बाजू मांडली. यानंतर अण्णा हजारे यांनी योग्य त्या कारवाईसाठी मुख्यमंत्री ठाकरेंशी बोलणार असल्याचं सांगितलं

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post