पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खा.विखेंच्या कन्येशी दिलखुलास संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खा.विखेंच्या कन्येशी दिलखुलास संवाद
 नगर : अहमदनगरचे खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली. मुलगी अनिषा हिने वडीलांकडे पंतप्रधान मोदींना भेटण्याचा हट्ट केला. तिनेच खा.विखेंच्या ईमेलवरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्याला प्रतिसाद देत पंतप्रधान मोदी यांनी विखे-पाटील यांना बोलावले. या सदिच्छा भेटीत विखे-पाटील यांनी कोविड काळात सरकारने केलेल्या विविध उपाययोजना आणि कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाबद्दल मोदींचे आभार मानले.

सदर भेटीदरम्यान पंतप्रधान मोदीजींनी माझी मुलगी कु. अनिषा सोबतही दिलखुलासपणे संवाद साधला, अशी माहिती विखे-पाटील यांनी दिली. यावेळी आ.राधाकृष्ण विखे-पाटील, सौ.धनश्री विखे उपस्थित होत्या.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post