नगरकरांवर आणखी एका आजाराचे सावट, महापालिकेने केले महत्त्वपूर्ण आवाहन


नागरिकांनी पाणी उकळून व गाळून प्यावे  नगर: विळद जलशुद्धीकरण केंद्र  येथे अमृत अभियान अंतर्गत नवीन जलशुद्धीकरण प्रकल्पाचे सुरु असलेल्या कामामुळे काही प्रमाणात गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून व गाळून प्यावे असे आवाहन महापालिकेने केले आहे.


केंद्रशासित अमृत अभियान योजनेचे काम प्रगतीपथावर असून त्या अंतर्गत विळद जलशुद्धीकरण केंद्र येथे नवीन जलशुद्धीकरण केंद्र येथून उपलब्ध होणार्‍या पाण्यामध्ये जलशुद्धीकरण प्रक्रिये शिवाय काही प्रमाणात मिसळले जात आहे. त्यादृष्टीने विळद जलशुद्धीकरण प्रकल्प व वसंत टेकडी जलकुंठ येथे तुरटी व क्लोरीनची मात्रा वाढवण्यात आलेली आहे.


या कामामुळे नागरिकांना काही प्रमाणात गढूळ पाण्याचा पुरवठा होण्याची शक्यता आहे. पावसाळ्याच्या दिवसात जलजन्य आजाराची शक्यता लक्षात घेता शहरातील सर्व नागरिकांनी पाणी उकळून व गाळून प्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post