अफगाणिस्तानात भयंकर परिस्थिती...१३४ सीटर विमानात ८०० प्रवाशांचा ठिय्या

अफगाणिस्तानात भयंकर परिस्थिती...१३४ सीटर विमानात ८०० प्रवाशांचा ठिय्याकाबुल : अफगाणिस्तानवर तालिबानने नियंत्रण प्रस्थापित केल्यानंतर तिथले नागरिक मिळेल त्या मार्गाने देश सोडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. अफगाणिस्तानमधील भीषणता दाखवणारा एका फोटो सोशल मीडियामध्ये चांगलाच व्हायरल होत आहे. अमेरिकेच्या 134 सीटर विमानात तब्बल 800 लोकांनी प्रवेश केल्याचं आणि तिथेच ठिय्या मांडल्याचं या फोटोतून दिसतंय. 

अमेरिकेतील डिफेन्स वन या वेबसाईटने हा फोटो अपलोड केला आहे. अमेरिकेच्या वायूदलाचे सी-17 ग्लोबमास्टर  हे विमान अमेरिकन नागरिकांची सुटका करण्यासाठी काबुलला गेलं होतं. या विमानातील प्रवासी संख्या ही 134 इतकी आहे. पण जसं या विमानाचे दार उघडले तसं विमानतळावर असलेल्या अफगाणी नागरिकांनी यामध्ये प्रवेश केला. जवळपास 800 लोकांनी या विमानात प्रवेश केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post