आदिवासी बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने जागतिक आदिवासी दिन साजरा

आदिवासी बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने जागतिक आदिवासी दिन साजरा नगर (शिवानंद भांगरे): आदिवासी बहुउद्देशिय सेवाभावी संस्था अहमदनगर, महादेव कोळी सेवाभावी संघ अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर शहरात ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष जगन्नाथ गोविंदा सावळे व कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मा.डाॅ.प्रा.शर्मिला भाऊसाहेब पारधे- देशमुख यांच्या हस्ते आदिवासी क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.प्रसंगी ऑल इंडिया आदिवासी एम्पाॅईज फेडेशन शाखा अहमदनगर जिल्हाचे अध्यक्ष श्री.देवेंद्र बहिरम व सचिवश्री.आबाजी भांगरे,मुख्याध्यापक रामचंद्र सुपे सर,श्री.शिवराम सगभोर साहेब,संस्था कार्याध्यक्ष शिवानंद भांगरे,सचिव सुरेश शेंगाळ,हिरामण पोपेरे,नवले सर,भारमल सर,सौ.सुधा धिंदळे,कु.दिक्षा भांगरे आदि मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रम प्रसंगी डाॅ.शर्मिला पारधे-देशमुख म्हणाल्या की," नकारार्थी विचार सोडुन आपल्या पुर्वजांच्या कार्यातुन प्रेरणा घेऊन काम करत रहावे.कुठल्याही परिस्थितीत डगमगुन न जाता ध्येय पुर्तीसाठी काम करावे.यश नक्कीच मिळते.

संस्थेचे अध्यक्ष श्री.जगन्नाथ सावळे यांनी संस्थेचे उद्देश व कार्य याची माहिती दिली.संस्थेने नव्याने सुरु केलेल्या वधु-वर सुचक मंडळाच्या वेबसाईटचा उपयोग करुन परंपरा जपाव्यात.उपस्थित मान्यवर देवराम बहिरम यांनी आदिवासी कर्मचार्‍यांनी संघटीत होऊन आपल्यावर चांगलं काम करतानां,हक्कावर गदा येत असेल संघटीत होऊन दाद मागावी असे अहवान केले.

जागतिक आदिवासी दिना निमित्त श्री व सौ.नंदा,निवृती सोमा भांगरे,श्री.व सौ.अंजना,निवृत्ती बुधा लांघी,श्री.व सौ.नंदा,भास्कर हरकू शेळके व श्रीमती अंजली बाळासाहेब सावळे या संघटनेतील सभासदांचा नोकरीतील सेवानिवृत्ती निमित्त सपत्नीक सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्तविक श्री.संतोष नवले सर,सुत्रसंचलन श्री.सेरेश शेंगाळ सर व आभार श्री.सोनवणे सर यांनी व्यक्त केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post