तहसीलदार देवरे यांच्या भ्रष्टाचारा विरोधात लोकायुक्तांकडे तक्रार, पाच कोटी 94 लाख रुपयांचा....

तहसीलदार  देवरे यांच्या भ्रष्टाचारा विरोधात लोकायुक्तांकडे तक्रार  आमदार लंके यांचे समर्थक अॅड. राहुल झावरे, संदीप चौधरी, ज्ञानेश्वर लंके, सुहास साळके यांनी प्रसिध्द विधीतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे यांच्या मार्फत मुंबईतील लोकायुक्तांकडे एक तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत तहसीलदार देवरे यांनी पाच कोटी 94 लाख रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचे म्हटले आहे. 

 या याचिके संदर्भात अॅड. असीम सरोदे यांनी पत्रकार परिषद घेतली. यात ते म्हणाले, पदाचा गैरवापर करणे, पदाचा वापर करून स्वतःसाठी झटपट पैसे कमविण्याचे साधन म्हणून ते वापरणे, लोकांवर दबाव टाकून मुद्दाम त्रास देण्यासाठी त्यांची वाहने बेकायदेशीर रित्या पकडणे, वाळू उत्खनन करणारे यंत्र बेकायदेशीरपणे सोडून देण्यासाठी पैसे घेण्याचा जो प्रकार आहे, त्यामुळे 5 कोटी 94 लाख रूपये एवढा मोठा घोटाळा समोर येत आहे. 

देवरे यांनी धुळे शहरात तहसीलदार असताना हजार कोटीच्या जमिनींचा गैरव्यवहार केला आहे. तिथल्या चौकशीतही निष्पन्न झाले आहे की, त्यांनी चुकीचे काम केले आहे. त्यामुळे या भ्रष्टाचारा विरोधात मुंबईतील लोकायुक्त आणि उपलोकायुक्त यांच्याकडे तक्रार करण्यात आलेली आहे. त्याची लवकरात लवकर सुनावणी होईल, असे अॅड. सरोदे यांनी सांगितले. सरकारनामाने याबाबतचं वृत्त दिले आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post