टाटा मोटर्सचा मान्सून धमाका..शेतकरी, पेन्शनधारक, कॉर्पोरेटसना कमी व्याजदरात 90 टक्के वाहन कर्ज

टाटा मोटर्सचा मान्सून धमाका..शेतकरी, पेन्शनधारक, कॉर्पोरेटसना कमी व्याजदरात 90 टक्के वाहन कर्ज


  

देशातील चौथी सर्वात मोठी ऑटो कंपनी बनलेल्या टाटा मोटर्सने  ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कमी व्याजदराची आणि कमी डाऊनपेमेंटची ऑफर आणली आहे. यासाठी टाटा मोटर्सने बँक ऑफ महाराष्ट्रसोबत  हातमिळवणी केली आहे. टाटा मोटर्स काही अटींवर ग्राहकांना 7.15% व्याजापासून कर्ज देणार आहे. हे व्याज रेपो रेटनुसार असणार आहे. 

कार्पोरेट ग्राहकांना कारच्या किंमतीच्या 80 टक्के कर्ज मिळणार आहे. या प्लॅननुसार पेन्शन मिळविणारे कर्मचारी, स्वत:चा स्टार्टअप खोलणारे, प्रोफेशनल, बिझनेस मॅन आणि शेतकऱ्यांना कारच्या एकूण किंमतीच्या (ऑन रोड) 90 टक्के कर्ज दिले जाणार आहे. कार्पोरेट ग्राहकांना 80 टक्के कर्ज दिले जाईल.  


टाटा मोटर्सची ही ऑफर 30 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. मान्सून धमाका ऑफरद्वारे ही कर्ज प्रक्रिया केली जाणार आहे. नव्या ग्राहकांना 7 वर्षांसाठी प्रति लाख 1517 रुपये सुरुवात विशेष EMI चा पर्याय देण्यात येणार आहे. कार्पोरेट कर्ज घेणाऱ्यांना आणि कार्पोरेट सॅलरी अकाऊंटवाल्यांना रिटर्नमेंट ऑफ इंटरेस्ट (ROI) मध्ये 0.25 टक्के सूट दिली जाणार आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post