जिल्ह्यातील 5 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त.....

 जिल्ह्यातील 5 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त अधिक ( ओडीएफ प्लस ) घोषित केले  - मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिरसागरनगर -  जिल्ह्यात हागणदारीमुक्त झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनही चांगल्या पद्धतीने सुरू असल्याने १५ अॉगस्टच्या पूर्व संध्येला जिल्ह्यातील 5 ग्रामपंचायतीच्या स्वयंघोषणेने हागणदारीमुक्त अधिक ( ओडीएफ प्लस ) घोषित करण्यात आल्याअसून  5 ग्रामपंचायती ओडीएफ प्लस होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  यांनी दिली.

   याबाबत  मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले ,सन २०१८ मध्ये स्वच्छ भारत मिशन ( ग्रामीण ) अंतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झालेल्या आहेत.सध्या जिल्ह्यात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचे काम सुरू आहे.त्यामुळे  नगर - हिवरे बाजार , राहता - लोणी बु.,लोहगाव, राहुरी - गणेगाव, दवंनगाव .      

    राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या १५ मार्च २०२१ च्या शासन निर्णयानुसार स्वच्छतेमधील शाश्वतता - वैयक्तिक शौचालय बांधकाम व नियमित वापर , वैयक्तिक व सार्वजनिक सांडपाणी व्यवस्थापन , वैयक्तिक व सार्वजनिक घनकचरा व्यवस्थापन , गावाची वैयक्तिक व सार्वजनिक दृष्यमान स्थिती , सार्वजनिक शौचालय स्थिती, गावातील सार्वजनिक ठिकाणाची सुविधा ( शौचालय , पाण्याची सुविधा) , घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन , प्लास्टिक कचरा व्यवस्थापन व मैला गाळ व्यवस्थापन या निकषांची पूर्तता करुन ग्रामपंचायती हाणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस ) केल्या जात आहेत.

     जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये हाणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस ) च्या निकषांची उत्स्फुर्तपणे पूर्तता करुन स्वच्छता शाश्वत ठेवावी असे आवाहन जलजीवन मिशन चे प्रकल्प संचालक  परिक्षीत यादव  यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post