अखेर शाळेची घंटा वाजली या तारखेपासून होनार शाळा सुरु

 मोठी बातमी,17 ऑगस्टपासून ग्रामीण भागातील 5 वी ते 7 वी, शहरी भागातील 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु होणारमुंबई: महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं राज्यातील शाळा सुर करण्यासंदर्भात मोठा निर्णय काही दिवासांपूर्वी जाहीर केला होता.  17 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्यासंदर्भातील शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आला आहे. राज्यातील कोरोना संसर्ग कमी झालेल्या भागातील निर्बंध शिथील केल्यानंतर सरकारचा हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे.   राज्यातील ग्रामीण भागात दि .17 ऑगस्ट 2021 पासून इयत्ता 5 वी ते 7 वी चे वर्ग आणि शहरी भागात इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग सुरु करण्यास शासनानं परवानगी दिली आहे.

कोरोना संसर्ग जादा असलेल्या जिल्ह्यांच्या निर्णयाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर

कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर या जिल्ह्यात कोविड परिस्थिती विचारात घेऊन शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post