2 लाखांची लाच...पालिकेचे दोन अभियंते ‘एसीबी’च्या जाळयात

2 लाखांची लाच...मुंबई पालिकेचे दोन अभियंते ‘एसीबी’च्या जाळयात मुंबई : नळजोडणीसाठी प्लम्बरकड़ून २ लाखांची लाच मागितल्याप्रकरणी पालिकेच्या ई वॉर्डमधील दोन अभियंते एसीबीच्या जाळयात अडकले आहे. यात दुय्यम अभियंता सचिन गणपत खोदडे (३९) आणि विश्वभर प्रलहादराव शिंदे (२८) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे  एका बांधकाम विकासकाकडील परवानाधारक  प्लम्बरकड़े अंडर लायसन्स प्लम्बर म्हणून काम करतात. ते काम करत असलेल्या विकासकाला एका इमारतीत पुनर्विकासाचे काम मिळाले होते. नमूद इमारतीच्या  नळजोडणीसाठी त्यांनी ई वॉर्डमध्ये अर्ज केला होता. याच अर्जाचा पाठपुरावा करत असताना शिंदेने त्यांच्याकडे दोन लाखांची लाच मागितली.  लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी ३० जुलै रोजी एसीबी कड़े धाव घेतली.

     

पुढे ठरल्याप्रमाणे त्यांनी अर्जाबाबत विचारणा करताच त्यांनीही शिंदेची भेट घेण्यास सांगितले. पुढे सोमवारी एसीबीने सापळा रचत एक लाख रूपयांची लाच स्वीकारताना शिंदेला रंगेहाथ पकड़ले. यात, खोदडेने त्याला पुढाकार दिल्याने त्यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post