बनावट सोने ठेवून कर्ज, एकाचवेळी 159 कर्जदारांवर गुन्हा दाखल

  बनावट सोने ठेवून कर्ज, एकाचवेळी 159 कर्जदारांवर गुन्हा दाखलशेवगाव -(संदीप देहाडराय):  राज्यात बहुचर्चीत ठरलेल्या नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेतील बनावट सोने तारण घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून त्यात गोल्ड व्हँल्यूअरसह १५९ कर्जदारांना आरोपी करण्यात आले आहे. शेवगाव शाखेचे व्यवस्थापक गोरक्षनाथ शिंदे यांच्या आत्महत्येनंतर सुत्रे वेगाने फिरली व गुन्हा दाखल झाला. अगोदरच गुन्हा दाखल झाला असता तर मयत शिंदे यांचे प्राण वाचले असते अशी खंत अनेकांनी व्यक्त केली.

     या प्रकरणी बँकेचे व्यवस्थापक अनिल वासुमल आहुजा ( वय- ५४) राहणार खंडोबानगर शेवगाव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सन २०१७ ते २०२१ या कालावधीत संबंधीत गोल्ड व्हँल्यूअर व कर्जदार यांनी वेळोवेळी संगनमत करुन बनावट दागीने खरे असल्याचे दाखवून मुल्यांकन दाखले देवून बँकेकडून कर्ज घेतले. कर्जदारांना वेळोवेळी नोटीसा देवूनही त्यांनी बँकेत तारण ठेवलेले सोने सोडून घेतले नाही. म्हणून काही दिवसांपूर्वी नगर येथे बँकेच्या मुख्य शाखेत या पिशव्यातील सोन्यांचा लिलाव ठेवण्यात आला होता. मात्र त्यातील सोने बनावट असल्याचे निष्पन्न झाले होते. वरील चार वर्षाच्या कालावधीत १५९ कर्जदारांनी ३६४ पिशव्यात २७ किलो ३५१ ग्रँम सोने बँकेकडे तारण ठेवून सुमारे ५ कोटी ३० लाख १३ हजार रुपये कर्ज घेतले होते. यामुळे बँकेचे गोल्ड व्हँल्युअर विशाल गणेश दहिवाळकर राहणार जैन गल्ली शेवगाव याच्यासह १५९ कर्जदारांवर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.  
    दरम्यान, या कारवाईमुळे सोने तारण कर्जदारांमध्ये एकच खळबळ उडाली असून अनेकांनी आपली फसवणुक झाल्याची प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. गोल्ड व्हँल्युअर, त्याचे दलाल संबंधितांना गाठून माझ्या नावे अगोदरच बँकेचे सोनेतारण कर्ज आहे. मला तातडीची आर्थिक गरज असून सोने मी देतो फक्त तुमच्या नावे बँकेत ठेवा असे सांगुन फसवणुक करत होते. मात्र हे सोने बनावट असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ज्यांच्या नावे सोनेतारण कर्ज घेतलेले आहे. त्यांचे चांगलेच धाबेदणाणले आहेत. या गुन्हयाचा तपास करतांना गोल्ड व्हँल्युअर सोबत बँकेतील इतर कोण सहभागी होते. तसेच त्यांचे दलाल यांचा ही शोध घेतल्यास अनेक तथाकथीतांचे पितळ उघडे होणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post