शाळांच्या आवारात थुंकण्यास प्रतिबंध, 1200 रुपयांपर्यंत दंड

शाळांच्या आवारात  थुंकण्यास प्रतिबंध,  1200 रुपयांपर्यंत दंड करोना व्हायरसचा वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक संस्था   आणि शाळांच्या आवारात  थुंकण्यास प्रतिबंध   करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. या ठिकाणी शिक्षक, पालक व सामान्य नागरिक थुंकल्यास आता त्यांना 200 रुपयांचा दंड   होणार आहे. एवढेच नव्हेतर असे वारंवार घडल्यास कमाल 1200 रुपयांपर्यंत दंड   वसूल करण्यात येणार आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची मुल्ये अंगी रुजवण्याची जबाबदारी शिक्षकांवर टाकण्यात आली आहे. याबाबतचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने काल जारी केले आहेत.


राज्यात कोविड-19   या विषाणूचा प्रादुर्भाव आहे. हा विषाणू हवेच्या माध्यमातून पसरणारा विषाणू आहे. या विषाणूने बाधित झालेल्या व्यक्तिने सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे इतर व्यक्तिही प्रभावित होऊ शकतात. व प्रसार वाढू शकतो. त्याचप्रमाणे क्षयरोग  व यांसारखे अन्य आजारांची लागण इतरत्र थुंकल्यामुळे होऊ शकतो. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे आरोग्य जपणे, त्यांच्या आरोग्याचे रक्षण करणे व त्यांना शिक्षणासाठी निरोगी वातावरण पुरविणे ही शासनाची जबाबदारी आहे त्यामुळे शाळा परिसरात थुंकल्यामुळे निर्माण होणारे आरोग्यविषयक संसर्ग विद्यार्थ्यांना होऊ नये व विद्यार्थ्यांना कोविड व इतर रोगांची लागण होऊ नये याकरिता सर्व शैक्षणिक संस्थामध्ये थुंकणे विरोधी मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्याची सर्व शाळांनी अंमलबजावणी करावी, असे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post