11वी साठी होणारी CET परीक्षा रद्द, हायकोर्टाचा निर्णय... शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या....

11वी साठी होणारी CET परीक्षा रद्द, हायकोर्टाचा निर्णय... शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या.... मुंबई: दहावीचा निकाल परीक्षा न घेता मूल्यमापन करून जाहीर केल्यानंतर राज्य सरकारने  राज्यात 11 प्रवेशसाठी  सीईटी घेण्याचे जाहीर केले होते. मात्र आता ही सीईटी अर्थात प्रवेश परीक्षा रद्द करण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाने हा महत्वाचा निकाल दिला. दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना 11 वी मध्ये प्रवेशासाठी 21 ऑगस्ट रोजी CET परीक्षा नियोजित होती. मात्र, हायकोर्टाने सर्व बाजू ऐकल्यानंतर प्रवेश परीक्षा रद्द करण्याचा निर्णयही घेतला.राज्य सरकारनं अकरावी सीईटी परीक्षेसाठी काढलेला अध्यादेश मुंबई हायकोर्टानं रद्द केला आहे. मुंबई हायकोर्टाचा निकाल वाचून पुढील निर्णय घेऊ, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post