राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात 11 भाविकांचा मृत्यू


राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात 11 भाविकांचा मृत्यू जयपूर : राजस्थानच्या बिकानेरमध्ये  राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 11 भाविकांचा मृत्यू झाला. क्रुझर गाडी आणि ट्रेलर यांची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाल्याची माहिती आहे. बिकानेर-जोधपुर हायवेवर नोखा नागौर भागात असलेल्या श्री बालाजी गावाजवळ हा अपघात झाला.

भाविकांची क्रुझर गाडी आणि ट्रेलर यांची समोरासमोर धडक होऊन बिकानेर-जोधपुर हायवेवर अपघात झाला. अपघातात आठ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर तिघा जखमी प्रवाशांनी रुग्णालयात उपचारादरम्यान प्राण सोडले. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना नोखा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. अपघातग्रस्त प्रवासी हे मध्य प्रदेशातील सजनखेडाव दौलतपूरचे रहिवासी असल्याची माहिती आहे. ते राजस्थानला देवदर्शनासाठी आले होते. बिकानेर-जोधपुर हायवेवर नोखा नागौर भागात असलेल्या श्री बालाजी गावाजवळ हा अपघात झाला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post