विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली, विरोधकांना पुन्हा चीत करु

 पाथर्डी- आमदार मोनिकाताई राजळे यांनी तालुक्यात विकासाचा डोंगर उभा केला असून त्यामुळे  तालुक्याची  विकासाच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. विरोधाकडे  विकासाचा कोणताही मुद्दा नसल्याने नगरपरिषद, पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूका जवळ आल्या आहेत त्यामुळे झोपा काढणारे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळे चहाच्या हॉटेल वर बसून काहीपण  बरळत आहेत. त्यामुळे आगामी काळात मतदार यांना भीक घालणार नाहीत माजी पंचायत समितीचे उपसभापती व सदस्य विष्णुपंत अकोलकर यांनी नाव न घेता विरोधकांवर निशाणा साधला आहे सुसरे येथे पंधरावा वित्त आयोग  पंचायत समिती स्तर यामधून सुसरे ते शिंदेवस्ती , सुसरे  ते प्रभूपिंप्री  , सुसरे ते गरडवस्ती., सुसरे ते कोरडगावरोड , सुसरे ते  पागोरी पिंपळगाव सुसरे ते खरडगावरोड आदी
 रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून त्यांचे उद्घाटन विष्णुपंत आकोलकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते यावेळी जिल्हा परिषद सदस्य राहूल राजळे, सरपंच दादापाटील कंठाळी, उपसरपंच राजेंद्र उदागे, वृद्धेश्वर कारखान्याचे संचालक श्रीकांत मिसाळ, ग्रामसेवक बढे भाऊसाहेब,मारुती काका मिसाळ,
अशोकराव उदागे, बबनराव उदागे,  आदिनाथ बर्डे,
बालाजी उदागे,मीठू हिंगे,महादेव उदागे,दिलीपाप्पा उदागे,
हानुतात्या उदागे,नारायण लोखंडे,  रघुनाथ शिंदे,
बाळासाहेब उदागे, अंकुश कंठाळी, रामनाथ कंठाळी, आदी उपस्थित होते. यावेळी अकोलकर म्हणाले की
मतदारसंघात विकासकामे करताना जनतेची गरज कोणती, याला प्राधान्य दिले जाते. गावाची लोकसंख्या किती, आपल्याला किती मते मिळाली, याचा विचार कधीच केला नाही. आ मोनिकाताई राजळे,
अतिशय शांत आणि मनमिळावू आमदार म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे  त्यांनी आजपर्यंत कोणत्याही नेत्यावर वैयक्तिक टीका केली नाही. मतदारसंघातील विकास कामांवर त्यांनी जोर दिल्याने त्यांना कार्यसम्राट आमदार ही पदवीच मतदारांनी बहाल केली आहे. तसेच आगामी काळात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका मोनिकाताई यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व ताकतीने लढू आणि विरोधकांना पुन्हा चीत करु असेही अकोलकर म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post