जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदली प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर

जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदली प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीरजिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने दीड महिन्यापूर्वीच ३१ मार्च २०२१ या अर्हता दिनांकानुसार बदलीपात्र कर्मचाऱ्यांची अंतिम यादी तयार केलेली आहे. आता ग्रामविकास विभागाने बदल्यांना परवानगी दिल्याने जिल्हा परिषदेकडून बदल्यांसाठी समुपदेशनाची प्रक्रिया राबवून बदलीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने कार्यवाही सुरू केली असून विभागनिहाय बदल्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.


शिक्षक वगळता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या वर्ग ३ व ४च्या बदल्या होणार आहेत. या बदल्यांची कार्यवाही ३१ जुलैपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.२० जुलै 

१० ते १ सामान्य प्रशासन


दु. २ ते ४ अर्थ विभाग


दु. ४ ते ६ कृषी विभाग


२१ जुलै 

१० ते २ महिला व बालकल्याण विभाग


दु. ३ ते ६ पशुसंवर्धन विभाग


२२ जुलै १० ते ११ लघू पाटबंधारे विभाग


११ ते १२ ग्रामीण पाणीपुरवठा


दु. २ ते ६ बांधकाम विभाग


२४ जुलै 

१० ते १ शिक्षण विभाग


दु. २ ते ६ आरोग्य विभाग


२५ जुलै

 १० ते ६ आरोग्य विभाग


२६ जुलै

 १० ते ६ ग्रामपंचायत विभाग


तालुकास्तरीय बदल्या २८ व २९ रोजी


जिल्हा परिषद मुख्यालयातील बदल्या २६ जुलैपर्यंत उरकल्यानंतर तालुका स्तरावरील बदल्या २८ व २९ रोजी होणार आहेत. बदली प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची अनियमितता झाल्यास त्यास संबंधित खातेप्रमुख, गटविकास अधिकारी व्यक्तीश: जबाबदार राहतील, असे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी बदली आदेशात म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post