धार्मिक कार्यक्रमाला परवानगी द्या वारकऱ्यांच्या वतीने पाथर्डी तहसीलदारांना निवेदन

धार्मिक कार्यक्रमाला परवानगी द्या वारकऱ्यांच्या वतीने पाथर्डी तहसीलदारांना निवेदन धार्मिक कार्यक्रमाला परवानगी मिळावी यासाठी मा तहसीलदार पाथर्डी यांना समस्त वारकरी समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले . महाराष्ट्र ही संतांची भूमी असून सकल संत मांदियाळीने समाजातील जातीयता नष्ट करत समाजातील एकोपा वाढवला . संत विचाराचा प्रचार प्रसार समाजातील सामाजिक जीवनाची प्रकल्भता शतकानुशतके वाढत आहे . समाजातील आध्यात्मिक संस्कृतीक ऐतिहासिक व सामाजिक जीवनाचे दर्शन संतांच्यामुळे घडत आहे . तेंव्हा अशा या संत विचाराच्या मुल्याची परंपरा म्हणजे आषाढीचा पायी वारी सोहळा देव आणि संताचे समारंभ व सोहळे आणि त्यांची अनेक शतकांची परंपरा जी  शतकानुशतके अखंडित चालू असलेली परंपरा सलग दोन वर्षे बंद आहे . तेंव्हा हे कार्यक्रम चालू व्हावेत वारकरी मंडळींना कोरोणा ची कल्पना आहे परंतु मागच्या वर्षी कोणाचा प्रभाव जास्त होता या वर्षी लसीकरण आणि काही गोष्टी माहीत असल्यामुळे व कोरोणाचा प्रभाव कमी असल्यामुळे सरकारने धार्मिक कार्यक्रमांना परंपरा परवानगी द्यावी . सरकारची कुठल्याही प्रकारची हालचाल दिसत नाही . लग्न , समारंभ  , मोर्चे , मार्केट , मॉल यामध्ये होणारी गर्दी हजारोंच्या संख्येने आहे . तेंव्हा या कार्यक्रमाला जर परवानगी दिली नाही तर भविष्यात वारकर्‍यांच्या वतीने व्यापक व उग्र स्वरूपात सत्याग्रह केला जाईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी म्हणून आज वारकऱ्यांच्या वतीने तहसीलदार पाथर्डी यांना निवेदन देण्यात आले आहे . हभप श्रीराम महाराज उदागे , श्री महादेव महाराज शिरसाट , विठ्ठल महाराज सोनाळे , भाऊसाहेब महाराज वाळके यांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post