अंबिका विद्यालयाचा अनुज्ञ वराडे एम.टी.एस. परीक्षेत राज्यात प्रथम

 अंबिका विद्यालयाचा  अनुज्ञ वराडे एम.टी.एस. परीक्षेत राज्यात प्रथमकेडगाव: -  श्री अंबिका माध्य.व उच्च माध्यमिक विज्ञान विद्यालय, केडगाव या विद्यालयाचा विद्यार्थी  अनुज्ञ  अभिजीत वराडे याने इयत्ता  आठवी एम.टी.एस. परीक्षेत राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.

२३ जानेवारी २०२१ रोजी  महाराष्ट्र राज्य प्रज्ञा शोध परीक्षा घेण्यात आली .या परीक्षेत  अनुज्ञ वराडे  याने १७२ गुण  मिळवून राज्य गुणवत्ता यादीत प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. अनुज्ञ च्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव शिवाजीराव भोर , स्थानिक सल्लागार समितीचे  सर्व सदस्य, विद्यालयाचे प्राचार्य तथा रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी कन्हेरकर  प्र.पर्यवेक्षक के.के.आठरे ,शिक्षक वृंद व  ग्रामस्थानी  अभिनंदन केले.

  वराडे अनुज्ञ यास एम.टी.एस. विभागप्रमुख एन.एस.काळे व विषय शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post