जिल्हा परिषद सदस्य आणि तहसीलदारानी घेतला जेसीबी चा ताबा नगर जिल्ह्यातील 'या' गावातील रस्ता झाला अतिक्रमणमुक्त ..व्हिडिओ

 जिल्हा परिषद सदस्य आणि तहसीलदारनी घेतला जेसीबी चा ताबा नगर जिल्ह्यातील 'या' गावातील रस्ता झाला अतिक्रमणमुक्तशेवगाव तहसीलदार अर्चना पागिरे यांना चक्क जेसीबी वर बसून  जिल्हा परिषद सदस्य  हर्षदा काकडे  प्रभुवाडगाव गदे वाडी  रस्त्याचा अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लावला
शेवगाव -प्रभूवाडगाव गावापासून नागरे वस्ती दोन ते अडीच किमी अंतरावर आहे. सदरच्या रस्त्यावर नागरे वस्ती, खेडकर वस्ती, हरिजन वस्ती असे मिळून जवळपास ६० ते ७० कुटुंब राहतात. या कुटुंबांना गावात येण्या-जाण्यासाठी प्रभूवाडगाव ते गदेवाडी हाच एकमेव रस्ता आहे. गावातील ८० % लोकांच्या जमिनी देखील याच रस्त्यावर असल्याने शेतकऱ्यांना देखील याच रस्त्याने ये – जा करावे लागते. जास्तीचा पाऊस आला तर विद्यार्थ्यांना रस्त्याअभावी शाळेला दांडी मारावी लागते. गावातील एका व्यक्तीने हा रस्ता अडवला असल्याने वेळोवेळी सदरच्या रस्त्यासाठी निधी मिळूनही अद्याप पर्यंत रस्ता झाला नाही. सदर व्यक्तींना बरेच वेळा ग्रामस्थांनी विनंती केली परंतु ते म्हणतात येथून रस्ता वगैरे काही नाही. तुम्हास आम्ही येथून जाऊ देणार नाही. काय करायचे ते करा असे म्हणून आडमुठेपणाची भूमिका घेत आहेत.
प्रभूवाडगाव ते गदेवाडी या रस्त्याचा प्रधानमंत्री नेटवर्क कव्हरेज मध्ये देखील समावेश आहे. सदरचा रस्ता हा प्रभूवाडगाव ते नागरे वस्ती १६५ ग्रामीण मार्ग म्हणून देखील ओळखला जातो. पावसाळ्यात सदरच्या रस्त्याला नदीचे स्वरूप तयार होते. कोणतीही वाहने या रस्त्याने आणता येत नाहीत. लोकांना रानातून वाट काढत गावामध्ये यावे लागते. कित्येकांचे रस्त्याअभावी दवाखान्यात वेळेत न पोहोचल्यामुळे मृत्यू झाले आहेत. अनेक महिलांचे देखील या रस्त्यामुळे सीजर करावे लागले आहेत. एकंदरीत दळण-वळण पूर्णपणे सदर रस्त्याअभावी ठप्प झाले आहे.
तरी आपणास नम्र विनंती की, प्रभूवाडगाव ते गदेवाडी हा बंद केलेला रस्ता खुला करून द्यावा व आपण या प्रश्नाकडे स्वतः लक्ष देऊन या रस्त्याअभावी लोकांची होणारी गैरसोय दूर करावी.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post