व्यंकटेश मल्टीस्टेटच्या अहमदनगर शाखेचा स्थलांतर सोहळा

 व्यंकटेश मल्टीस्टेटच्या अहमदनगर शाखेचा सोहळा थाटात संपन्न     अहमदनगर जिल्ह्यातील व्यंकटेश मल्टीस्टेट गेली १० वर्षांपासून आर्थिक व्यवहारात अग्रेसर असणारी संस्था. या संस्थेचे महाराष्ट्र व कर्नाटका सह एकूण 22 शाखांचे विस्तीर्ण जाळे असून 31 मार्च 2021 अखेर संस्थेने 300 कोटीचा व्यवसाय पूर्ण केला आहे.

        व्यंकटेश मल्टीस्टेट च्या अहमदनगर शहरामध्ये गेली ८ वर्षांपासून बँकिंग सेवा , सावेडी मध्ये, झोपडी कॅन्टींन जवळ कार्यरत होती . पण नवीन डिजिटल विविध सेवा पुरविण्यासाठी शाखेचे नवीन जागेत स्थलांतर हे एकविरा चौक, पाईपलाईन रोड या ठिकाणी केले आहे.

         या उदघाटन प्रसंगी अहमदनगर शहराचे आमदार संग्राम भैय्या जगताप , शहराच्या महापौर  रोहिणीताई शेंडगे,  मा. आमदार चंद्रशेखर घुले पाटील. भागवतजी बनकर,  अध्यक्ष, शनिशिंगणापूर संस्थान, जिल्हा उपनिबांधक दिग्विजय आहेर, मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश आण्णा बावळे. नागेबाबा उद्योग समूहाचे अध्यक्ष कडूभाऊ काळे,  साई आदर्श मल्टीस्टेट चे चेअरमन शिवाजीराव कापले,  शहराचे विविध नगरसेवक,  खातेदार,  ठेवीदार,  कर्जदार उपस्थित होते.

       व्यंकटेश मल्टीस्टेट बँकिंग क्षेत्रात अग्रेसर असणारी एकमेव संस्था आहे. या संस्थेने आत्तापर्यत डिजिटल व्यवहार व्हावे,  यासाठी ATM मशीन,  स्वाईप मशीन,  QR कोड, मोबाईल अँप,  नेट-बँकिंग,  RTGS/ NEFT / IMPS  अशा विविध सेवा संस्था सर्व शाखेत पुरवत आहे. संस्थेने आतापर्यंत                  व्यवसाय कर्ज,  शेतकरी कर्ज योजना अशा प्रकारचे विविध कर्ज सुविधा उपलभद्ध करून दिल्या आहेत.

        या वेळी संस्थेचे संस्थापक अभिनाथ शिंदे,  व्हाईस चेअरमन व्यंकट देशमुख,  संचालक अनिल गुंजाळ,   मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णा मसुरे,  उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश देहेडकर, उपव्यवस्थापक अंबादास पांडे,  विभागीय अघिकारी,  शित्रे प्रशांत,  काकडे ज्ञानेश्वर,  लक्ष्मण दारुंटे,  आंबेकर , शाखां व्यवस्थापक खेत्रे संदीप, व्यंकटेश फाउंडेशनचे मॅनेजर डायरेक्टर ज्ञानेश्वर  झांबरे,  डेव्हलपमेंट ऑफिसर राम तांबे, व व्यंकटेश परिवारातील सर्व अधिकारी, कर्मचारी वृंद उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post