युवकांच्या जागृकतेमुळे दुर्मिळ 'श्रृंगी' घुबडास मिळाले नवजीवन...video

 युवकांच्या जागृकतेमुळे दुर्मिळ श्रृंगी घुबडास मिळाले नवजीवन नगर  - मदडगाव येथील अमोल साळवे, दिपक पाडळे, सचिन गायकवाड व सागर अंबरीत या युवकांना शेती परिसरात एक घुबड जखमी अवस्थेत आढळुन आले. निसर्गप्रेमी नितीन अळकुटे यांच्या मार्गदर्शनानुसार बर्ड हेल्पलाईन पथकातील ऋषीकेश परदेशी व शिवकुमार वाघुंबरे यांच्या मदतीने त्यास निसर्गप्रेमी तथा जैवविविधता संशोधन व संवर्धन समुहाचे निसर्ग अभ्यासक जयराम सातपुते यांच्याकडे पुढील उपचारार्थ दाखल केले गेले.

अगदी रक्तभंबळ अवस्थेतील त्या जखमी घुबडाचे प्राण वाचणे अतिशय कठीण वाटत असले तरी त्यावर त्यांनी तातडीने औषधोपचार केले. सुरूवातीचे अनेक दिवस केवळ द्रवरूप अन्नपदार्थ खाणार्‍या त्या घुबडच्या जखमा हळुहळु भरून येवु लागल्या, काही दिवसातच ऊर्जावान होवुन ते घन पदार्थही खावु लागले. या दरम्यान त्यास दररोज नियमितपणे मोकळे सोडुन दिवसातुन दोन वेळा उडण्याचा सरावही देण्यात आला.तब्बल तीन महिण्यांच्या सातत्यपुर्ण सुश्रूषा व सुयोग्य आहाराने हे श्रृंगी घुबड पुर्णपणे बरे झाले.


वनपरिक्षेञ अधिकारी सुनिल थिटे व वनरक्षक कानिफराम साबळे यांच्या उपस्थितीत त्या घुबडाने त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त भरारी घेतली. 


"जैवविविधता संशोधन व संवर्धन समुहातर्फे गेल्या १२ वर्षांपासुन बर्ड हेल्प लाईन राबवली जाते तसेच जिल्हास्तरावर पक्षीगणना केली जात आहे. या पक्षी गणनेतुन प्राप्त माहीतीनुसार अहमदनगर जिल्ह्यात एकुण पाच प्रजातींच्या घुबडांची नोंद झालेली असुन त्यापैकी श्रृंगी घुबड हे आकाराने मोठे व दुर्मिळ प्रजातींपैकी एक आहे. जिल्ह्यात या श्रृंगी घुबडाच्या नैसर्गिक अधिवासाच्या तीन ठिकाणांची नोंद आत्तापर्यंत केली गेली असुन त्या ठिकाणी या श्रृंगी प्रजातींचे घुबड नेहमी आढळतात व विणही करतात. अशा ठिकाणांपैकी एका ठिकाणी या घुबडास मुक्त केले गेले. या घुबडाच्या गंभीररित्या जखमी होण्यामागे व पायाच्या तोडल्या गेलेल्या बोटांवरून हे घुबड अंधश्रद्धेस बळी पडल्याचे दिसते. अज्ञानी समाजातील अंधश्रद्धा त्यातुन जादुटोणा या कारणांमुळे घुबडांवर मानवी हल्ले होतात व त्यासाठी छुपी तस्करी होते त्यातुन या प्रजातींचे आस्तित्व दिवसेंदिवस धोक्यात येत आहे अशी माहीती निसर्ग अभ्यासक जयराम सातपुते यांनी दिली.


श्रृंगी घुबडासचे इंग्रजी नाव युरेशियन इगल अऊल असे असुन डोक्यावर असलेल्या शिंगांप्रमाणे असलेल्या पिसांमुळे त्यास श्रृंगी घुबड असे म्हणतात. अधिवासासाठी हा पक्षी अत्यंत घनदाट जंगले न निवडता भरपुर झाडांचे पण खुल्या शेततजमिनी तसेच दर्‍याखोर्‍यांच्या प्रदेशाची निवड करतात. श्रृंगी घुबड हे निशाचर असुन मानवास त्रासदायक ठरणार्‍या व रात्री बाहेर पडणार्‍या उंदरांचा मोठ्या प्रमाणावर नाश करतात त्यामुळे ते मानवास उपयुक्त असुन निसर्ग अन्नसाखळीत त्यांना महत्वाचे स्थान आहे. यासाठी त्यांचे संवर्धन होणे अतिशय गरजेचे आहे.


व्हिडिओ : (विक्रम बनकर)
0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post