छिंदम विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यास गृह विभागाची परवानगी

 

छिंदम विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यास गृह विभागाची परवानगी
छत्रपती शिवाजी महाराज विषयी वादग्रस्त वक्तव्य


नगर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला भाजपचा माजी उपमहापौर श्रीपाद शंकर छिंदम (वय ३५) याच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यास गृहविभागाने परवानगी दिली आहे. गृह विभागाचे उपसचिव संजय खेडेकर यांनी त्यासंदर्भात आदेश काढले असून ते तोफखाना पोलीस स्टेशनला प्राप्त झाले आहेत. शासकीय पदावर असल्या कारणाने भादंवि कलम १९६ (१) (अ) प्रमाणे तोफखाना पोलिसांनी गृह विभागाकडे दोषारोपपत्र दाखल करण्याची परवानगी मागितली होती. येत्या दोन दिवसांत छिंदम विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले जाणार आहे. या गुन्ह्याचा तपास तोफखाना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण सुरसे करीत आहेत. फेब्रुवारी २०१८ मध्ये छिंदम हा उपमहापौर असताना महापालिकेच्या बांधकाम विभागाचे कर्मचारी अशोक बिडवे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून वाद घातला. त्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरले. अपशब्दांची ही ऑडिओ क्लिप राज्यभर व्हायरल झाली. त्याचे राज्यभर पडसाद उमटले. अहमदनगर शहरात दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. छिंदमचे नगरसेवक पद रद्द व्हावे, यासाठी महापालिकेच्या सभागृहात ठराव झाला. हा ठराव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला. राज्यात भाजप सरकार होते. त्यावेळी ठरावावर निर्णय झाला नाही. विधान परिषदेचीही निवडणूक लढवली. त्यात त्याचा पराभव झाला होता.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post